कोरची शहरतील रस्त्याच्या कडेला असलेले खड्डे बुझवा
कोरची: आज राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी कोरचीच्या वतीने युवा तालुकाध्यक्ष स्वप्निल कराडे यांच्या नेतृत्वात तसेच राकाँ शहराध्यक्ष अविनाश हुमणे यांच्या उपस्थितीत शहरातील रस्त्याच्या कडेला असलेले खड्डे बुजविण्याबाबत नगरपंचायत कोरची येथे माननीय कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
सतत येणाऱ्या पावसामुळे कोरची शहरातील अनेक इतरत्र भागात रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. व तसेच त्याच बरोबर रस्त्याच्या कडेला टाकलेला मुरूम पावसामुळे वाहून गेलेला आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला मोठ मोठे खड्डे पडलेले दिसून येत आहेत.
हेही वाचा: सोयाबीन कापनीसाठी जाणाऱ्या मजुरांचे वाहन पलटून मोठा अपघात, एकाचा मृत्यू तर तिघेजण जखमी
कोरची मुख्य मार्केट पासून तर इतरत्र सर्व रस्त्याच्या कडेचे हाल समान आहे. यामुळे सामान्य नागरिकांना गाडी पार्क करायला व इतरत्र परिसरात वावरायला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी कोरची नगरपंचायतीने सदर बाबीचे नोंद घेऊन या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत रस्त्याच्या कडेला असलेले खड्डे लवकरात लवकर बुजवण्याचे कार्य करावे. अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष स्वप्निल कराडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे शहर सरचिटणीस आनंदभाऊ पंधरे, उपाध्यक्ष मोसिम जाडिया, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष विनोद गुरणुले, भूमेश्वर चोपकर, समिर शेंडे, शिद्धार्थ जांभुळकर, रोशन सोनकुसरे व इतर युवा कार्यकर्ते उपस्थित होते.