दिंडोरी: बिबट्याने घेतले आठवड्याभरात दोन चिमुरड्यांचे बळी - Batmi Express Nashik

Nashik News,Nashik Marathi News, Marathi News,Latest News in Marathi,Batmi Express Gadchiroli,दिंडोरी: बिबट्याने घेतले आठवड्याभरात दोन चिमुरड्यांचे बळ

Nashik News,Nashik Marathi News, Marathi News,Latest News in Marathi,Batmi Express Gadchiroli,दिंडोरी: बिबट्याने घेतले आठवड्याभरात दोन चिमुरड्यांचे बळी
दिंडोरी: बिबट्याने घेतले आठवड्याभरात दोन चिमुरड्यांचे बळी

दिंडोरी: 
गिरणारे इथं बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुरडीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असताना सोमवारी पुन्हा एकदा बिबट्याने दिंडोरी तालुक्यातील जुने धागुर परिसरात एका चार वर्षीय मुलीला आपले भक्ष्य बनवले आहे.

कृतिका विठ्ठल वराडे असे या चार वर्षे मुलीचे नाव आहे. गुजरात मधील वाढवली गावातील हे कुटुंब शेतातील मजुरी करण्यासाठी दिंडोरीला आले होते.

हेही वाचा: सोयाबीन कापनीसाठी जाणाऱ्या मजुरांचे वाहन पलटून मोठा अपघात, एकाचा मृत्यू तर तिघेजण जखमी

मुलीच्या आईसमोर बिबट्याने अचानक हल्ला करुन तिला फरपटत नेले. आईने आरडाओरडा केल्यानंतर शेतकरी गावकऱ्यांनी त्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न केला. 

मात्र नंतर जंगलामध्ये त्या मुलीचे काही अवयव आढळून आले आहे. बिबट्याच्या हल्ल्याची ही आठवडाभरातील दुसरी दुर्दैवी घटना आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.