'
30 seconds remaining
Skip Ad >

चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या निर्माणाधिन इमारतीला भीषण आग - Batmi Express Chandrapur

0

Chandrapur News,Chandrapur city medical college huge fire,Marathi News, News,Latest News in Marathi,Chandrapur Marathi News,Batmi Express Chandrapur
चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या निर्माणाधिन इमारतीला भीषण आग

चंद्रपूर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पागल बाबा नगर स्थित निर्माणाधिन इमारतीला सायंकाळी भीषण आग लागली. ( Chandrapur city medical college huge fire )  हि घटना आज ५ रोजी सायंकाळी 7:30वाजताच्या दरम्यान घडली. रात्री ९.३० नंतरही आग आटोक्यात आली नव्हती. आतापर्यंत आठ सिलेंडरचा स्फोट झाले.

मेडिकल कॉलेज इमारत परिसरात कामगारांच्या झोपड्या असून सायंकाळी स्वयंपाक करते वेळी घरगुती गॅस सिलेंडर ( Gas Cylinder) चालू असताना लिक झाल्याने त्याचा मोठा स्फोट झाला, अचानक झालेल्या स्फोटाने कामगार सैरावैरा पळू लागले, मात्र आगीने रौद्र रूप धारण करीत दुसऱ्या झोपड्या पण यामध्ये जळल्या व त्यातील सिलेंडरचा स्फोट झाला. 

हेही वाचा: सोयाबीन कापनीसाठी जाणाऱ्या मजुरांचे वाहन पलटून मोठा अपघात, एकाचा मृत्यू तर तिघेजण जखमी

आग लागल्यावर इमारतीच्या 2 किलोमीटर वरील परिसर स्फोटाने हादरून गेला. सदर आगीत 8 सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. 

घटनास्थळी 4 अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या असून रामनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेत जीवित हानी किंवा काही कामगार जखमी झाले का? याची माहिती सध्या तरी अस्पष्ट आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×