मित्रासोबत पोहायला जाण बेतले जीवावर...पंधरा वर्षीय युवकाचा नाल्यात बुडून मृत्यू - Batmi Express Chandrapur

चंद्रपूर: पंधरा वर्षीय युवकाचा नाल्यात बुडून मृत्यू,Chandrapur News,Marathi News, News,Latest News in Marathi,15-year-old youth drowned in a nala

चंद्रपूर: पंधरा वर्षीय युवकाचा नाल्यात बुडून मृत्यू,Chandrapur News,Marathi News, News,Latest News in Marathi,15-year-old youth drowned in a nala
.पंधरा वर्षीय युवकाचा नाल्यात बुडून मृत्यू

चंद्रपूर
:- गावालगतच्या नाल्यात पोहायला गेलेल्या दोघा मित्रापैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारच्या सुमारास चंद्रपूर पासून जवळच असलेल्या घुग्घूस लगतच्या चिंचाळा नाल्यात घडली. चेतन उर्फ चंद्रहास उसनेकर (वय 15) असे मृतकाचे नाव आहे.  ( A 15-year-old youth drowned in a nala )

Read Also: चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या निर्माणाधिन इमारतीला भीषण आग

घुग्घुस लगतच्या पडोली पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चिंचाळा येथील दोघे मित्र दुपारच्या सुमारास फिरत फिरत गावालगतच्या नाल्यात पोहायला गेले. दोघेही पोहण्याकरीता नाल्यात उतरले. त्यापैकी चेतन उसनेकर याला खोल भागातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. सोबत असलेला मित्र गौरव मारोती भेलके (वय ११) रा. सहकार नगर हा बचावला. हेही वाचा: चंद्रपूर: धक्कादायक;  शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्याध्यापकाचे विद्यार्थिनी सोबत अश्लील कृत्य

त्याने सदर घटनेची माहिती गावात येऊन सांगितली. प्रतिष्ठित व्यक्ती प्रकाश शेंडे व त्यांच्या सहकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन युवकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.