अमिर्झा टोली: ‘ त्या ‘ १५ वर्षीय तरुणीचा मृत्यू बोडीतील पाण्यात बुडूनच ? मोबाईलने शोध घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू | बातमी एक्सप्रेस गडचिरोली

अमिर्झा येथे बोळीत आढळला १५ वर्षीय तरुणीचा मृतदेह, बातमी एक्सप्रेस गडचिरोली,body of a 15-year-old girl was found in a bid at Amirza ,Gadchiroli News

Gadchiroli,गडचिरोली: गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा टोली येथील अल्पवयीन युवतीचा मृतदेह दोन दिवसापूर्वी गावाजवळच्या बोडीत आढळला होता तिचा मृत्यू पाण्यात बुडूनच झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून जवळजवळ स्पष्ट झाले. मात्र ती त्या बोडीजवळ कशासाठी गेली होत , तिने आत्महत्या केली की तिला कोणी बोडीत ढकलले अशा प्रश्नांसह या घटनेमागील पार्श्वभूमी उघड होणे अजून बाकी आहे. किरण सुनील चंदनखेडे ( १५ वर्ष ) या मुलीचे आईवडील सोयाबीन कापणीसाठी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात गेले असताना ही घटना घडली.

हि पण बातमी वाचा: अमिर्झा येथे बोळीत आढळला १५ वर्षीय तरुणीचा मृतदेह; घातपात की आत्महत्या ?

नवव्या वर्गात शिकत असलेल्या किरणसोबत तिची आजी आणि लहानभाऊ गावातच होते. दि . १५ पासून ती बेपत्ता होती. दि . १६ ला ती गायब सल्याची तक्रार गडचिरोली पोलिसात करण्यात आली तर दि . १७ ला तिचा मृतदेह बोडीत तरंगताना आढळला. विशेष म्हणजे पोलिसांनी सर्व खबरदारी घेत व्हिडिओ शुटींगमध्ये या घटनेचा पंचनामा केला, तसेच दोनमहिला डॉक्टरांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. तिच्यावर अत्याचार झाल्याचे किंवा अंगावर जखमा असल्याचे आढळले नाही. त्यामुळे किरणने आत्महत्या केली असण्याची शक्यता आहे. 

हि पण बातमी वाचा: Accident News: वाहनाच्या धडकेत अकरा शेळ्यांचा जागीच मृत्यू

मात्र तसे असेल तर तिला आत्महत्येस प्रवृत्त करणारा कोण? हे शोधण्याचे आव्हान कायम आहे. घरी आलेला ‘ तो ‘ युवक कोण ? किरण बेपत्ता होण्यापूर्वी कोणीतरी युवक तिच्या घरी आला होता , अशी माहिती तिच्या लहान भावाने पोलिसांना दिल्याचे समजते. 

त्यावरून पोलिसांनी संशयित युवकाचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. त्याचा सीडीआर मागविला असून त्यावरून त्या युवकाचा सदर घटनेशी काही संबंध आहे का , याचा शोध लागू शकेल , असे पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांनी सांगितले .

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.