Chandrapur News: अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी दोन वाहनांवर कारवाई | बातमी एक्सप्रेस चंद्रपूर

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News: अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी दोन वाहनांवर कारवाई

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News: अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी दोन वाहनांवर कारवाई
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी दोन वाहनांवर कारवाई - File Pic

Chandrapur News: 
जिल्हा भरारी पथकाने दि.19 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता रामनगर पोलीस स्टेशन, चंद्रपूर  येथे तसेच ईरई नदी पात्राजवळ दाताळा रोड, चंद्रपूर येथे अवैध रेती वाहतूक  करणाऱ्या दोन वाहनांवर जप्तीची कारवाई केली. सदर कारवाई अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

हि पण बातमी वाचा: चंद्रपूर जिल्ह्यात मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई कधी होणार?

हि पण बातमी वाचा: Accident News: वाहनाच्या धडकेत अकरा शेळ्यांचा जागीच मृत्यू

सदर वाहनाची तपासणी केली असता अवैध रेती वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाल्याने रामनगर पोलीस स्टेशन, चंद्रपूर येथे मिथिलेश चन्ने यांच्या मालकीचे हॉपटन वाहन क्र. एमएच-34, एम-4363 व ईरई नदी पात्राजवळ दाताळा रोड, चंद्रपूर येथे वैभव सुनील होकम यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्र. एमएच-34, एपी-1654 या दोन्ही वाहनांची जप्ती करून हॉपटन वाहनावर रुपये 1 लक्ष 22 हजार 200 तर ट्रॅक्टरवर 1 लक्ष 5 हजार 260 याप्रमाणे दंड आकारण्यात आला असून वसुली कार्यवाही करण्यात येत आहे. असे अपर जिल्हाधिकारी विदयुत वरखेडकर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.