बल्लारपूर:- शेतात बैलबंडी ने जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एक बैलासह दोन शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली.
बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथील घटनेनंतर नागरिकांनी तीव्र संताप करीत बलारपूर ते कोठारी मार्गावर तीव्र आंदोलन केला आहे. हेही वाचा: लाखांदूर: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षापासून बलात्कार
कळमना येथील कुंडलिक काळे व अंबादास दुधकोहळ हे बैलबंडीने शेतात जात होते दरम्यान कोठारी मार्गाने येनाऱ्या अज्ञात वाहनांची जोरदार धडक बसल्याने एक बैलासह बंडीवरील दोघेही जागीच ठार झाले. परंतु वाहन चालक वाहणासह पळून गेला लोकांना घटनेची माहिती होताच मोठी गर्दी झाली पोलिसांनाही माहिती देण्यात आली या घटनेमुळे जनतेत तीव्र आक्रोश व्यक्त होत असून काही काळ तणाव स्थिती झाली होती बल्लारपूर पोलीस घटना स्थळी पोहचली असून पुढील कारवाई सुरू केली आहे.