'
30 seconds remaining
Skip Ad >

विवाहीत प्रेमीयुगुलाने पळून जाऊन वैनगंगा नदीत दोघांनीही उडी मारून केली आत्महत्या - बातमी एक्सप्रेस वरोरा

0

विवाहीत प्रेमीयुगुलाने पळून जाऊन वैनगंगा नदीत दोघांनीही उडी मारून केली आत्महत्या,वैनगंगा नदीत दोघांनीही उडी मारून केली आत्महत्या
विवाहीत प्रेमीयुगुलाने पळून जाऊन वैनगंगा नदीत दोघांनीही उडी मारून केली आत्महत्या

वरोरा
: नवऱ्याशी पटत नसल्याने दिरा सोबत सूत जुळवून एक महिन्यापूर्वी बांद्रा येथून पळून जाऊन असलेल्या गायब विवाहीत प्रेमीयुगुलाने काल रात्री महागाव तालुक्यातील धानोडा जवळील वैनगंगा नदीत आत्महत्या केल्याचा संशय निर्माण झाला आहेत. प्राप्त माहितीनुसार असे कळते की वरोरा तालुक्यातील बांद्रा येथील रहिवासी संदीप चिंचोलकर यांच्याशी भद्रावती तालुक्यातील चालबर्डी येथील सोनाली दानव हिचा १५ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघांचा संसार काही वर्षे व्यवस्थित सुरू होता. 

मात्र सोनालीचा दीर हेमंत राजेंद्र चिंचोळकर यांच्याशी प्रेम संबंध निर्माण झाले ह्या प्रेमसंबंधातून हे दोघेही एक महिन्यापूर्वी घरून निघून गेले त्यानंतर त्यांचा काहीच पत्ता मिळाला नसल्याने सोनालीच्या नातेवाईकांनी मद्रावती पोलीस स्टेशन मध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी शोध घेतला मात्र त्यांचा काहीही पत्ता लागला आपण सर्वजण शांत बसले होते. 

काल रात्री महागाव जवळील धानोडा येथील पुलावरून वैनगंगेच्या पात्रात उडी घेतली असावी असा संशय व्यक्त होत असून कारण की पुलावरील लोखंडी कठड्याला सदर तरुणीची पर्स व बॅग लटकून होती त्या बॅगमध्ये हेमंत राजेंद्र चिंचोलकर तरुणाचे आधार कार्ड असून तरुणीचा व तरुणांचा फोटो सुद्धा आढळला. सदर तरुण व तरुणी सायंकाळी धनोडा येथे बस मधून उतरले त्यांच्या बॅगमध्ये नागपुर व रामटेक बसची तिकिटे आढळली आहेत. या दोघांनाही दोघांनीही धनोडा येथे बिस्किट व फराळाचे साहित्य विकत घेतले व हे दोघे दोन तासापर्यंत घनोडा बस स्टैंड वर व परिसरात फिरत असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले व लगेच काही वेळानंतर धनोडा पुलावर त्यांची बॅग लटकलेली आढळली त्यावरून त्या दोघांनाही आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पुढील चौकशी महागाव पोलिस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×