'
30 seconds remaining
Skip Ad >

Gadchiroli News: 'मातृ वंदना सप्ताह' चा जिल्हयात शुभारंभ | बातमी एक्सप्रेस गडचिरोली

0

Gadchiroli News:  'मातृ वंदना सप्ताह' चा जिल्हयात शुभारंभ ,'मातृ वंदना सप्ताह' चा जिल्हयात शुभारंभ,Gadchiroli News,बातमी एक्सप्रेस गडचिरोली
Gadchiroli News:  'मातृ वंदना सप्ताह' चा जिल्हयात शुभारंभ 

Gadchiroli News:
प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत शासनाकडून शहरी/ग्रामीण भागातील सर्व विवाहीत प्रथम गरोदर मातेला प्रथम हप्ता रुपये 1000/- दुसरा हप्ता रुपये 2000/- व तिसरा हप्ता रुपये 2000/- असे एकुण रुपये 5000/- लाभ दिला जातो. प्रधानमंत्री मातृ वंदना योजने पासुन लाभार्थी लाभा पासुन वंचित राहणार नाही या करीता संपूर्ण देशात मातृ वंदना सप्ताह दिनांक 01 सप्टेंबर ते 07 सप्टेंबर 2021 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यलय, जिल्हा परिषद, गडचिरोली येथून करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.संजयकुमार जठार, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, डॉ.समिर बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी गडचिरोली, डॉ.सुनिल मडावी, युनिसेफ सल्लागार, डॉ.सोनु मेहर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक,डॉ.राहुल ढिंगळे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक,कुमारी अश्विनी मेंढे,PMMVY, श्री.धिरज सेलोटे, जिल्हा आशा समन्वयक, श्री.चंदु वाघाडे, जिल्हा कार्यक्रम सहाय्यक, PMMVY व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी गडचिरोली डॉ.समिर बनसोडे, यांनी केले या वेळी त्यांनी सप्ताहामध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत माहिती दिली. तालुका आरोग्य अधिकारी गडचिरोली डॉ .सुनिल मडावी, यांनी या योजने बाबत सविस्तर माहिती दिली. मातेच्या दृष्टीने अत्यंत महत्वपुर्ण असुन जिल्हयातील तळागळातील सर्व माता पर्यंत या योजनेचा लाभ पोहचणार या दृष्टीने आरोग्य यंत्रणा सक्रीय कार्य करीत आहे. आशा स्वयंसेविका घरोघरी जावून नविन लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्यात येणार आहे. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी गडचिरोली डॉ.संजयकुमार जठार, यांनी योजनेचे जास्तीत जास्त प्रसिध्दी व्हावी व या योजनेची माहिती खालील सर्व गावस्तरावर ते जिल्हास्तरापर्यंत सप्ताहामध्ये पोहचविण्याबाबत माहिती दिली व या योजनेपासुन कुठलाही लाभार्थी सुटणार नाही याबाबत आरोग्य यंत्रणा दक्षता घेत आहे असे सांगितले.

"सुरक्षित जननी विकसित धारणी” या घोष वाक्याने दिनांक 01 सप्टेंबर 2021 रोजी सप्ताह उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद गडचिरोली तसेच जिल्हा शल्य चिकीत्सक सामान्य रुग्णालय गडचिरोली डॉ.अनिल रुडे, यांचे अधिनिस्त महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमामध्ये मुख्यतः पोषण आहारा विषयी गरोदर व स्तनदा मातांना गरोदरपण पश्चतः वार्ड येथे प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताह व पोषण आहार सप्ताह या दोन सप्ताहांची सांगड घालून संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आले.
Gadchiroli News:  'मातृ वंदना सप्ताह' चा जिल्हयात शुभारंभ

प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत सप्टेंबर 2017 ते 31 मार्च 2022 पर्यंत राज्यस्तरावरुन 31412 एवढे उद्दिष्टे या जिल्हयाकरीता देण्यात आलेले आहे. त्यापैकी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत 29821 इतके उद्दिष्टे साध्य करण्यात आलेले आहे, अनुदान लाभार्थ्यांचे खात्यात DBT द्वारे जमा करण्यात आलेले आहे. म्हणजे या जिल्हयाचे काम 95 टक्के पुर्ण झालेले आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता आशा स्वयंसेविका/अंगणवाडी सेविका/आरोग्य सेविका/आरोग्य उपकेंद्र/प्रा.आ.केंद्र/ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा.
आहारा विषयी आहारतज्ञ श्रीमती माधवी, व वैद्यकिय अधिकारी डॉ.पेदांम यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा कार्यक्रम समन्वयक प्र.मा.वं.यो.गडचिरोली कुमारी अश्विनी मेंढे, यांनी केले आणि आभार प्रदर्शन आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य विभाग जि.प. गडचिरोली प्रविण गेडाम, यांनी केले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×