अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच केला बलात्कार |
उरळ : दिवसेदिवस अल्पवयीन मुलीवर अत्याचार च्या घटनेत वाढ होऊ लागली आहे. उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या एका गावात चक्क जन्मदात्या बापानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडीस आली आहे. या घटनेची माहिती अल्पवयीन मुलीने उरळ पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ( Minor Girl Raped By Her Birth Father )
मिळालेल्या माहितीनुसार: उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या एका गावात दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात स्वयंपाक करत होती. मुलीची आई ही शेतात काम करण्यासाठी गेली होती. मुलगी घरी एकटी असून घरातील उरलेलं काम करीत होती, एकटी असल्याचा फायदा घेत नराधम बापाने तिला मारहाण करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.
पीडित मुलीची आई शेतातून घरी आल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने आईसह उरळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दिली. तक्रार प्राप्त होताच ठाणेदार अनंत वडतकर व पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच बापाला तत्काळ अटक करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव करीत आहेत.