Nagpur News: सेल्फीच्या नादात गोसेखुर्दमध्ये बुडून दोन भावंडांचा मृत्यू |
Nagpur News: सेल्फीच्या नादात दोन सख्ख्या भावंडांचा नागपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पात (Gosekhurd Nagpur) बुडून मृत्यू (Two brothers died) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नागरिकांनी गोसेखुर्द धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी अनेकांनी स्वतःची सेल्फी काढण्यास सुरुवात केली. सेल्फी काढत असताना अचानक एकाच पाय मातीच्या ढिगाऱ्यावरुन घरसराला आणि तो वाहत्या पाण्यात पडला. भावाला वाचवण्यासाठी कुठलाही विचार न करता दुसऱ्या भावाने वाहत्या पाण्यात उडी मारली. मात्र, दुर्दैवाने दोन्ही भावांचा बुडून मृत्यू झाला. हे दोघेही नागपुरातील उमरेड येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.