Jalgaon Crime News: शुल्लक कारणावरून पती पत्नीस बेदम मारहाण
Jalgaon Crime News: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील हनुमानवाडी या गावात क्षुल्लक कारणावरून पती पत्नीस बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बालचंद राठोड हा गाव गुंड असून या इसमाने शेजारी राहणाऱ्या पती पत्नीस बेदम मारहाण केली आहे. बालचंद राठोड याच्यावर अनेक गुन्हे देखील दाखल आहेत.
दरम्यान महिलेला अमानुष मारहाण केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या विषयी सर्वत्र माहिती झाली आहे.मारहाण झालेल्या पतीस गोदावरी रुग्णालय जळगाव तर पत्नीला शासकीय रुग्णालय जळगाव या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे.
तीन दिवस उलटल्यानंतर देखील पोलीसांनी दखल घेतले नसल्याचे समोर आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.