Parbhani News: परभणी जिल्ह्यात काम करण्यास मोठा वाव : जिल्हाधिकारी गोयल
Parbhani: भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा महोत्सव परभणी जिल्ह्यात दिमाखात संपन्न झाला. परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण केले. यावेळी स्वातंत्र्य चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या शूर वीरांना मानवंदना देण्यात आली.
पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे परभणीबरोबर गोंदिया जिल्ह्याचे ही पालकत्व आहे,त्यामुळे त्यांनी गोंदीया येथे ध्वजारोहण केले, त्यामुळे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना ध्वजारोहण केले.शुभेच्छापर भाषणात जिल्हाधिकारी गोयल यांनी नागरिकांना ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आपण जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
परभणी जिल्ह्यात काम करण्यास मोठा वाव असून अधिकारी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी सहकार्याची भावना ठेवावी असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी गोयल यांनी जाऊन घेतल्या.