नेवजाबाई हितकारिणी (NH) महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा |
ब्रह्मपुरी:- नेवजाबाई हितकारिणी (NH) महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथे आज स्वातंत्र्यदिन शासनाने ठरवून दिलेल्या कोविड-19 च्या निमानुसार साजरा करण्यात आला. या प्रसंगी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. एस. एम. शेकोकार यांनी केले, या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे, उपप्राचार्य डॉ. डी. एच. गहाणे, कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक प्रा. एम. एम. भोयर, कनिष्ठ महाविद्यालय संचालक मेजर विनोद नरड, 20 माह. Boys बटालियन,3 माह. गर्ल्स बटालियन, प्राध्यापक वृंद, शिक्षिकेतत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमचे यशस्वीतेसाठी श्री. संजू मेश्राम, श्री. मिथुन चौधरी, विकास पाटील यांचे सहकार्य लाभले