![]() |
विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या |
हायलाइट्स:
- सार्वजनिक विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली
- विवाहितेची हत्या कि आत्महत्या ?
- पोटात आढळले ८ महिन्याचे अर्भक कुणाचे ?
ब्रम्हपुरी जवळील खंडाला येथे माहेरी राहत असलेल्या विवाहित महिला सुचिता मनोहर राखडे वय (28) हिने काल दि.9 ऑगस्टला रात्री दहा वाजताच्या सुमारास शौचालयास बाहेर जात असल्याचे कारण सांगून सार्वजनिक विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली .या घटनेची माहिती ब्रम्हपुरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत आज दि १० ऑगस्टला शवविछेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे आणले असता शव विछेदनामध्ये आठ महिन्याचे अर्भक आढळून आल्याने विवाहितेची हत्या कि आत्महत्या ? ते अर्भक कुणाचे ? या चर्चेला पेव फुटले आहे. (Married woman commits suicide by jumping into a well )
हेही वाचा: अंगावर विज पडुन शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; बाेडधा येथील घटना
सुचिता मनोहर राखडे हिचा विवाह २०१७ मध्ये झाला होता . लग्नानंतर पंधरा महिन्यांनी पतीने तब्येत बरी राहत नसून व तब्येतीत सुधारणा होत नसल्याचे कारण सांगून सुचीताला सोडचिट्टी दिल्याने ती खंडाला येथे आई वडीलाकडे राहत होती. काल दि.9 ऑगस्टला रात्री१० वाजताच्या दरम्यान सुचिता व तिची आई शौचालयाला जाऊन घरी परतल्या . थोड्या वेळानंतर सुचिता अंगणात फिरतो असे आईला सांगून घराशेजारील चुलत बहिण हिला बोलाहून अंगणात फिरायला निघाली. बराच वेळ होऊनही ती घरात परत आली नाही. त्यामुळे तिचा आजूबाजूला शोधाशोध सुरु असतांना घराशेजारी असलेल्या विनायक राखडे यांच्या शेताजवळील सार्वजनिक विहिरीकडे पाहिले असता सुचीताच्या चपला दिसल्या व विहिरीच्या पाण्यात ओढणी तरंगताना दिसली व गळ टाकले असता मृतदेह आढळून आला. या घटनेची पोलिसात तक्रार देण्यात आली. (Married woman commits suicide by jumping into a well )
शव विछेदनामध्ये आठ महिन्याचे अर्भक आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली. यानंतर फिर्यादी मनोहर राखडे यांनी माझी मुलगी गावातील रत्नाकर पुंडलिक शेंडे यांच्या शेतावर जास्तीत जास्तवेळा एकटीच कामाला जात होती त्यामुळे त्याने माझ्या मुलीचा एकांतवासाचा फायदा घेतल्याने ती आठ महिन्याची गर्भवती राहिली . अशी तक्रार ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून मर्ग दाखल करून कलम १७४ नुसार गुन्हा दाखल केला. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून रत्नाकर शेंडे याला ताब्यात घेतले आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. सुचीताची हत्या कि आत्महत्या? हे मात्र तपासाअंती स्पष्ट होईल.