चंद्रपूर जिल्ह्यात पीओपी मूर्ती आढळल्यास 10 हजारांचा दंड
हायलाइट्स:
- दुकाने सील, डिपॉझिट जप्त आणि दोन वर्षे बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाईल.
- गणेश मूर्तीच्या दुकानात पीओपी मूर्ती आढळल्यास १० हजारांचा दंड.
- श्रीगणेशाच्या पीओपी मूर्तींची निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये
गणेशोत्सवाला महिनाभर वेळ असला तरी तयारी मात्र मूर्तिकारांनी आतापासूनच सुरु केली आहे. केंद्र शासनाने श्रीगणेशाच्या पीओपी मूर्तींवर कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन जाहीर बंदी केलेली आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये श्रीगणेशाच्या पीओपी मूर्तींची निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये, यासाठी मनपाने कडक अंमलबजावणी होणार असं सांगीतलं आहे. (Strict ban on POP idols in Chandrapur District)
गणेश मूर्तीच्या दुकानात पीओपी मूर्ती आढळल्यास 10 हजारांचा दंड, दुकाने सील, डिपॉझिट जप्त आणि दोन वर्षे बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा मनपाने दिला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत पीओपी मूर्ती बंदी संदर्भात शहरातील मूर्तिकाराची बैठक सोमवारी घेण्यात आली. सदर बैठकीत पीओपी मूर्तींवर बंदी संदर्भात मूर्तिकार प्रतिनिधीची प्रतिक्रिया जाणून घेण्यात आली. दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत पीओपी मूर्तींवर पूर्णतः बंदी राहणार आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.