![]() |
नवोदयची परीक्षा सुरू; अकरावी सीईटी, एमपीएससीच्या परीक्षा मात्र रद्द |
हायलाइट्स:
- परीक्षा घेणे हे मुलांचा जीव धोक्यात घालण्यासारखे
- महाराष्ट्रभरात नवोदयच्या परीक्षा मात्र सुरू
- मुलांच्या परीक्षा घेणे योग्य आहे का ?
परीक्षा देण्यासाठी अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले आहेत. राज्य सरकारने अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने राज्य शासनाचा हा निर्णय रद्द केला. यासोबतच अशी परीक्षा घेणे म्हणजे मुलांच्या जीवाशी खेळ असल्याचं मत देखील व्यक्त केलं, असं असताना महाराष्ट्रभरात नवोदयच्या परीक्षा मात्र सुरू आहेत. बीड जिल्ह्यात एकीकडे रुग्ण संख्या वाढत असताना या मुलांच्या परीक्षा घेणे योग्य आहे का ? असा सवाल विचारला जातोय.