CET 2021 Cancelled: अकरावी सीईटी प्रवेश परीक्षा रद्द ..! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय | बातमी एक्सप्रेस

mharashtra fyjc cet 2021, fyjc cet 2021, maharashtra fyjc admission, maharashtra fyjc cet exam,

mharashtra fyjc cet 2021, fyjc cet 2021, maharashtra fyjc admission, maharashtra fyjc cet exam,
CET 2021 Cancelled: अकरावी सीईटी प्रवेश परीक्षा रद्द ..! 

Maharashtra FYJC CET 2021 Cancelled: 
शिक्षणविभागाने (Education Department) दिलेल्या माहितीनुसार, '21 ऑगस्ट' रोजी अकरावी प्रवेशासाठी सीईटीची परीक्षा राज्यभरात घेतली जाणार होती.  मात्र आज  उच्च न्यायालयाकडून अकरावीची सीईटी प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली आहे. इयत्ता दहावीत मिळालेल्या मार्क्सच्या आधारावर विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असें उच्च न्यायालयाने आज सांगितले आहे. CET साठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने 2 ऑगस्टपर्यंतची मुदत वाढ दिली होती. तर, 11वी प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होणार?, याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. (Maharashtra FYJC CET 2021 Cancelled)

आता सीईटी रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला आहे. याचबरोबर, सहा आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाकडून शिक्षण मंडळास  देण्यात आले आहेत. राज्य मंडळाने दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर केल्यानंतर राज्य शासनाच्या निर्णयानुसार अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार होती.  

ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षातालुका ठिकाणावर  होणार होती व 19 जुलैपासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार होती. कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. (Maharashtra FYJC CET 2021 Cancelled) त्यामुळेच न्यायालयाला याप्रकरणी हस्तक्षेप करावा लागला, असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.