ब्रह्मपुरी सुसाईड! एकमेकांच्या हाताला दोर बांधून प्रेमीयुगुलाने घेतली वैनगंगा नदीत उडी मारून आत्महत्या..!

प्रेमप्रकरणातून एकमेकांच्या हाताला दोर बांधून प्रेमीयुगुलाने घेतली वैनगंगा नदीत उडी मारून आत्महत्या,वैनगंगा नदीत उडी मारून आत्महत्या,

Bramhapuri,suicide,

ब्रह्मपुरी
: ब्रम्हपुरी तालुक्यातील चिंचोली बुजुर्ग येथील अल्पवयीन युवक व युवतीचे प्रेत गडचिरोली जिल्हातील आरमोरी तालुक्यातील शिवणी घाटावर दि. 7  ऑगस्टला सायंकाळच्या दरम्यान आढळून आले . स्वाती दिलीप मेश्राम वय 15 वर्ष व आशिष प्रभू मेश्राम वय 17 वर्ष दोघेही रा.चिंचोली बुजुर्ग त.ब्रम्हपुरी येथील आहेत. दोघांनीही एकमेकाच्या हाताला दोर बांधून वैनगंगा नदीपात्रात आत्महत्या केली . सदर आत्महत्या हि प्रेम प्रकरणातून केली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे . ( Couple Committed Suicide By Jumping  Iinto The Wainganga River )

हेही वाचा: Nagbhid Suicide News: बेपत्ता इसमाचे शव सापडले त्याच्याच शेतात, फाशी घेऊन केली आत्महत्या

प्राप्त माहितीनुसार: स्वाती व दिलीप हे दोघेही 3 ऑगस्ट पासून बेपत्ता होते . दोघांच्याही कुटुंबीयांनी ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन येथे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. दोघांचीही शोध मोहीम ब्रम्हपुरी पोलिसांनी राबविली होती . दरम्यान आज दि 7  ऑगस्टला स्वाती व आशिषचा मृतदेह आरमोरी तालुक्यातील शिवणी घाटावर एकमेकाच्या हाताला दोर बांधलेल्या अवस्थेत आढळून आला (Couple Committed Suicide In Bramhapuri) . पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पो हा अरुण पिसे करीत आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.