'
30 seconds remaining
Skip Ad >

सावली तालुक्यात वाघाच्या हल्यात मेंढपाळ गंभीर जखमी; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु | बातमी एक्सप्रेस

0

सावली तालुक्यात वाघाच्या हल्यात मेंढपाळ गंभीर जखमी,वाघाच्या हल्यात मेंढपाळ गंभीर जखमी,Tiger Attack in Sawali
सावली तालुक्यात वाघाच्या हल्यात मेंढपाळ गंभीर जखमी

सावली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या पाथरी उपवनक्षेत्रातील पालेबारसा बिट अंतर्गत उसरपार च्या कक्ष क्र. १४८ मधील भूम तलावाच्या पोटात वाघाच्या हल्यात ( Tiger Attack in Sawali ) मेंढपाळ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सदर घटनेतील जखमी मेंढपाळाला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.  वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मेंढपाळाचे नाव नारायण जगेवार असे आहे. ( Tiger Attack in Sawali )

हेही वाचा: देसाईगंज-कोरेगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार घटना अशी की , रात्रौच्या सुमारास उशीर झाला म्हणून मेंढपाळ नारायण बिरा जगेवार रा.जुनासूर्ला ता.मूल हे आपला मेंढ्या चा कळप भूम तलावाच्या पोटात ठेवून मेंढ्याच्या बाजूला जाळी लावून झोपला असता रात्रौ २ वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघाने त्याच्यावर हल्ला ( Tiger Attack in Sawali ) केला. त्यात मेंढपाळ नारायण हा गंभीर जखमी झाला. सदर घटनेची माहिती वनरक्षक राकेश चौधरी यांना माहिती होताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले  व वरीष्ठ अधिकारी यांना घटनेची माहिती दिली. त्यावरून सावली वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत कामडी, पाथरी चे वनपाल वासुदेव कोडापे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. जखमी मेंढपाळ नारायण जगेवार यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आलेले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×