बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार
देसाईगंज: देसाईगंज ( वडसा) तालुक्यातील कोरेगाव रावनवाडी परिसरात बिबट्याचा वावर असून काल शुक्रवार ६ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान कोरेगाव येथील शंकर मस्के यांच्या गोठ्यातील बांधलेल्या बैलावर हल्ला करून बिबट्याने बैलास ठार केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत बैल मालक शंकर मस्के वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती कळविली. त्यांनतर कोरेगावचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. बावणे, शंकरपुर क्षेत्राचे मेनेवार, रावणवाडी वनरक्षक कांबळे, वनरक्षक आसलवर यांनी येऊन पंचनामा केला. या घटनेमुळे कोरेगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन शेतीच्या हंगामात बैल ठार झाल्याने शंकर मस्के यांना वन विभागाकडून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
ऑगस्ट ०७, २०२१
0
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.