Maharashtra Floods LIVE: रत्नागिरी, रायगडमधील पूर आणि दरडी कोसळून सुमारे 100 जणांचा मृत्यू?

Maharashtra Floods LIVE,Maharashtra Floods LIVE 2021,Maharashtra Floods LIVE News, रत्नागिरी, रायगडमधील पूर आणि दरडी कोसळून सुमारे 100 जणांचा मृत्यू?

Maharashtra Floods LIVE: रत्नागिरी, रायगडमधील पूर आणि दरडी कोसळून सुमारे 100 जणांचा मृत्यू

Maharashtra Floods LIVE: 

कोकणातील रत्नागिरी व रायगड या दोन जिल्ह्याना काल पावसाने अक्षरशः झोडपून काढले. आज पर्यत नसेल आलं असा महापूर या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी बघायला मिळाला आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे 100 जणांचा पूरामुळे आणि दरडी कोसळल्यामुळे मृत्यू झाला आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. (Maharashtra Floods LIVE)

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर आणि महाड तालुक्यातील दरड कोसळल्याने घटनांमध्ये ५० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. रायगडमध्ये ६ जण वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे.

रत्नागिरी जिल्हयात महापूराचा हाहाकार वाढतच जात आहे. महापूर आणि  दरड कोसळल्याने 38 ग्रामस्थांसह 29 पाळीव जनावरांचा मृत्यू झाला आहे. या 38 जणांमधील पुरामुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे.  दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरूच असून त्यानंतर अधिकृत मृतांचा आकडा लवकरच स्पष्ट  होणार आहे.

खेड तालुक्यातील बीरमणी येथील जयवंत भाऊराव मोरे यांच्या घरावर दरड कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी बेपत्ता असून 3 म्हैस व 2 गाई बेपत्ता आहेत. शोध कार्य सुरुच आहे. तर पोसरी बौद्धवाडीतील 7 कुटुंबातील 20 ग्रामस्थ आणि 24 जनावरे दरडीखाली गेले आहेत. आणि यातील 3 जणांचे मृतदेह सापडले असून अन्य 17 जणांचा शोध सुरूच आहे. यातील 10 ग्रामस्थ जखमी झाले आहेत.

चिपळूण परशूराम घाटामध्ये दरड कोसळून 2 लोक मृत झाल्याची माहिती पोलीस निरिक्षकांकडून वायरलेसद्वारे मिळाली आहे. चिपळूण अपरांत हॉस्पिटलमध्ये 11 कोविड रुग्णांचा मृत्यू व नैसर्गिक आपत्तीमुळे अन्य 3 जणांचा मृत्यू झाला आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये मदतकार्य वेगाने सुरु आहे. मात्र मोबाईल नेटवर्क नसल्याने संपर्कात अडथळे येत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.