भद्रावती तालुक्यात खर्रा आणायला गेलेल्या महिलेवर बलात्कार
भद्रावती:- जिल्ह्यात अत्याचार करण्याच्या घटनेस दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. भद्रावती तालुक्यात एक महिला रात्रीच्या वेळेस पानटपरीवर खर्रा आणण्यास गेली असता तिच्यावर अत्याचार करण्यात आला. घटना दि.१३ जुलैच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास तालुक्यातील घोसरी या गावात घडली.
हेही वाचा: चामोर्शी: दीड वर्षीच्या चिमुकल्या मुलीसह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, भद्रावती तालुक्यातील घोसरी येथे एक विवाहित महिला रात्रीच्या वेळेस पानटपरी वर खर्रा आणण्यास गेली. रात्री ९ वाजताच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत त्याच गावातील विनायक बबन नगराळे (४०) याने सदर महिलेस कुठे गेली होतीस अशा प्रकारे विचारणा करत महिलेला जबरदस्तीने उचलून आसपासच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याची धक्कादायक घटना घडली.
महिलेला जबरदस्तीने उचलून नेत असताना पीडित महिला जोरात आरडा-ओरड करताच तिचा मुलगा व पती धाऊन आले. त्यामुळे आरोपीने तेथून पळ काढला.
हेही वाचा: धक्कादायक! गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
दि.१४ जुलै रोजी पिडीत महिलेने भद्रावती पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विनायक नगराळे यास अटक केली असून त्याच्याविरुद्ध भा.दं.वि.३७६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार सुनिलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनत एपीआय सुधीर वर्मा पुढील तापस करीत आहे.
दरम्यान, महिलांवर अत्याचार करण्याच्या आरोपाखाली अटक होण्याची तालुक्यातील तीन दिवसांतील दुसरी घटना आहे. यापूर्वी दि.११ जुलै रोजी भद्रावती शहरातील डोलारा तलाव वस्तीतील अशोक नथ्थू वनकर या आरोपीस नाबालिक मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.