'
30 seconds remaining
Skip Ad >

Gadchiroli Corona Updates: तीन मृत्यूसह आज 73 नवीन कोरोना बाधित तर 36 कोरोनामुक्त | Batmi Express Marathi

0
Gadchiroli Corona Updates,Gadchiroli Corona News,Gadchiroli News,गड़चिरोली कोरोना अपडेट
Coronavirus in Gadchiroli (Representative image)
Gadchiroli Corona Updates: आज जिल्हयात 73 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 36 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 11050 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10322 वर पोहचली. तसेच सद्या 610 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 118 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.
$ads={1}
Gadchiroli Corona Deaths Updates: आज तीन नवीन मृत्यूमध्ये दोन चंद्रपूर जिल्ह्यातील असून एक 60 वर्षीय व दुसरी व्यक्ति ही 67 वर्षीय असून दोन्ही महिला आहेत. तर एक व्यक्ति ही तालुका अहेरी आलापल्ली येथील 48 वर्षीय पुरुष आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.41 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 5. 52 टक्के तर मृत्यू दर 1.07 टक्के झाला.
Gadchiroli Corona New Updates: नवीन 73 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 48, आरमोरी 1, चामोर्शी 2, धानोरा तालुक्यातील 1, कोरची 2, कुरखेडा 2, मुलचेरा 1, सिरोंचा 14, तर वडसा तालुक्यातील 2 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 36 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 16, अहेरी 5, आरमोरी 4, भामरागड 1, चामोर्शी 1, धानोरा 1, एटापल्ली 2, सिरोंचा 1, कुरखेडा 2, तर वडसा मधील 3 जणांचा समावेश आहे.
$ads={2}
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये रामनगर 2, रेड्डी गोडाऊन चौक 1, स्थानिक 4, लांजेडा 1, साईनगर 2, वनश्री कॉलनी 4, अयोध्यानगर 5, मेडिकल कॉलनी 4, सुभाष वार्ड 2, मौशीखाम 1, सर्वोदय वार्ड 1, शेडमाके चौक 1, कन्नमवार वार्ड 4, नवेगाव 3, रेव्हेन्यु कॉलनी 1, रामराज भवन 1, कलेक्टर कॉलनी 1, सरकार नगर 2, सीआरपीएफ 1, स्नेहनगर 1, बजाज शोरुमच्या मागे 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये पुराडा 1, गुरनोली 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये विजय नगर 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये रेगडी 1, फॉरेस्ट कॉलनी 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये चातगांव 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, मसेली 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, मोयाबिनपेठा 2, नेमाडा 10, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये कन्नमवार वार्ड 1, अकापुर 1, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 5 जणांचा समावेश आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×