'
30 seconds remaining
Skip Ad >

Mumbai Live: दिलीप वळसे पाटील होणार महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री ? Batmi Express Marathi

0

शरद पवार, दिलीप वळसे पाटील, उद्धव ठाकरे, अनिल देशमुख, अजित पवार, Maharashtra Home Minister Dilip Walse Patil, Dilip Walse Patil News, Dilip Walse Patil Latest News, Dilip Walse Patil Breaking News, anil deshmukh resignation
नवी गृहमंत्री कोण होणार अशी चर्चा रंगली आहे.

Mumbai Live: मुंबई 
चे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांमुळे अखेर अनिल देशमुख  यांना गृहमंत्रिपदावरून पायउतार झाले आहे. त्यामुळे नवी गृहमंत्री कोण होणार अशी चर्चा रंगली आहे. तर जलसंपदा मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. खुद्द दिलीप वळसे पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

$ads={1}

दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रिपद स्वीकारावे अशी राष्ट्रवादीच्या गोटात रंगली होती. अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी याआधीही गृहमंत्रिपद सांभाळले होते. त्यामुळे अशा अडचणीच्या काळात अनुभवी अशा नेत्याकडे गृहमंत्रिपद द्यावे अशी चर्चा राष्ट्रवादीत रंगली होती. वृत्तसंस्थेशी बोलत असताना दिलीप वळसे पाटील यांनी अखेर या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लवकरच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

दिलीप वळसे पाटील हे आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. दिलेली जबाबदारी चोखपणे बजावणे यासाठी ते प्रसिद्ध आहेत. शिवाय आतापर्यंत तरी वादापासून दूर राहणे त्यांना जमलेलं आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा विचार शरद पवार यांनी केला.

$ads={2}

यापूर्वीही विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर असलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली आणि भाजपने घेतलेले सर्व आक्षेप फेटाळून लावले. यामुळे महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×