चंद्रपूर हादरले! मित्र नगरात दगडाने हल्ला करून इसमाची हत्या | Batmi Express

Be
0

Chandrapur,Chandrapur Murder,Chandrapur Crime,Chandrapur Today,Chandrapur News,Chandrapur Live,

चंद्रपूर : शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मित्र नगर परिसरात गुरुवारी रात्री एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मृत व्यक्तीची ओळख संतोष अरुण भेंडे अशी झाली आहे. ते मूळचे अमरावती जिल्ह्यातील पाला गावचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे. गुरुवारी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास मित्र नगर परिसरात ते असताना एका दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.

हल्लेखोराने मोठा दगड उचलून संतोष भेंडे यांच्या डोक्यावर वार केल्याची माहिती मिळाली आहे. हा हल्ला इतका गंभीर होता की, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी तातडीने दुचाकीवरून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले आणि रामनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाची सूत्रे हाती घेतली.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, वैयक्तिक वाद, जुने वैमनस्य किंवा इतर कोणत्या कारणातून हा प्रकार घडला का, याचा तपास पोलीस विविध अंगांनी करत आहेत. या घटनेनंतर मित्र नगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

 


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->