आरमोरीत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ | Batmi Express

Be
0

Armori,Armori Crime,Armori Suicide,Armori News,Armori Today,Armori Live,Gadchiroli,Gadchiroli Suicide,

आरमोरी (गडचिरोली) :
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरात रविवारी सकाळी एका ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

मृत व्यक्तीची ओळख मनोहर किसन नंदनवार (वय ६५) अशी झाली असून, ते आरमोरी शहरातील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाजवळ वास्तव्यास होते. रविवारी सकाळी काही नागरिक तहसील कार्यालयाच्या मागील परिसरातून जात असताना एका झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मनोहर नंदनवार दिसून आले. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी तातडीने आरमोरी पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

प्राथमिक तपासात ही आत्महत्येची घटना असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला, तरी त्यांनी हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिस विविध अंगांनी तपास करत असून मृत्यूमागील कारणांचा शोध घेत आहेत.

या घटनेमुळे आरमोरी शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांमध्येही या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

 


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->