क्रूर शेवटाने हादरले गाव; पत्नीची हत्या केल्यानंतर पतीचीही आत्महत्या | Batmi Express

Be
0

Nanded,Nanded Live,Nanded Marathi News,Nanded News,

नांदेड :
हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथे घडलेल्या दुहेरी मृत्यूच्या घटनेने परिसर हादरला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीनेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मृतांमध्ये पायल विनोद राठोड (वय ३५) आणि विनोद रंगराव राठोड (वय ४०, रा. धारजणी फुलवाडी तांडा, ता. भोकर) यांचा समावेश आहे.

माहितीनुसार, हे दाम्पत्य आपल्या तीन मुलांसह नातेवाईकांच्या विवाहासाठी बोरगडी तांडा येथे आले होते. लग्नसमारंभादरम्यान झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

समारंभात पत्नीने नृत्य केल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेच्या वेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला.

दरम्यान, सकाळी गावालगतच्या शेत परिसरात पतीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पत्नीच्या हत्येनंतर भीती आणि पश्चातापातून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी वैजने, पोलीस निरीक्षक अमोल भगत आणि पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे दाम्पत्याची एक मुलगा आणि दोन मुली आई-वडिलांविना पोरकी झाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->