NEET पेपरफुटी तपासाचे धागेदोरे विदर्भात; ब्रह्मपुरीत CBI ची गुप्त धाड | Batmi Express

Be
0

 

Bramhapuri,Bramhapuri News,Bramhapuri Today,Bramhapuri Live,Bramhapuri News,neet paper leak,cbi raid,chandrapur crime,vidarbha education scam

चंद्रपूर : देशभरात चर्चेत आलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता विदर्भापर्यंत पोहोचला असून केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) चंद्रपूर जिल्ह्यात गुप्त कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. लातूरमधील प्रसिद्ध कोचिंग क्लास संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर तपास अधिक वेगाने सुरू झाला आहे.

CBI च्या दिल्लीस्थित आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात एका संशयित विद्यार्थ्याच्या घरी छापा टाकला. ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आल्याने स्थानिक पोलिसांनाही याची पूर्वकल्पना नव्हती.

माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी नांदेडमधील मोटेगावकर यांच्या कोचिंग संस्थेशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे CBI थेट विद्यार्थ्याच्या घरापर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

छाप्यामध्ये विद्यार्थ्याचा मोबाईल फोन, काही डिजिटल उपकरणे आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका किंवा उत्तरांची माहिती पुरवण्यात आली होती का, तसेच यामध्ये आर्थिक व्यवहार झाले होते का, याचा तपास आता CBI करत आहे.

लातूर, नांदेडनंतर आता चंद्रपूरपर्यंत तपास पोहोचल्याने विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आगामी काळात आणखी काही विद्यार्थी आणि कोचिंग क्लासेस तपास यंत्रणांच्या रडारवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->