आष्टीतील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचा दहावीला ९०.९० टक्के निकाल | Batmi Express

Be
0

आष्टीतील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचा दहावीला ९०.९० टक्के निकाल

आष्टी
: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या निकालात आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल ९०.९० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उज्ज्वल कामगिरी करत यशाची परंपरा कायम राखली आहे.

यंदा शाळेतील एकूण ८८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे १७ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणी मिळवली असून २३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश मिळवले आहे.

अंकित वाशिक बावणे याने ८८.२० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. कुमारी अनुक्षा किशोर राऊत हिने ८६ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर कुमारी स्नेहल रविकुमार बुगावार हिने ८४.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल वन वैभव शिक्षण मंडळ, अहेरीचे सचिव बबलूभैया हकीम तसेच शाहीनभाभी हकीम यांनी अभिनंदन करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी शाळेचे प्राचार्य किशोर पाचभाई, पर्यवेक्षक घाटबांधे, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच गुणवंत विद्यार्थी अंकित बावणे याच्या घरी जाऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. त्याच्या पालकांचेदेखील अभिनंदन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->