चंद्रपूर: विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची ६० टक्के रक्कम महाविद्यालयात जमा करावी | Batmi Express

Be
0

Maha DBT,शिष्यवृत्ती,Scholarship,Chandrapur,Chandrapur News,

चंद्रपूर
: केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून निधी वितरणाची सुधारित पद्धत लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी केलेले अर्ज संबंधित जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडून मंजूर झाल्यानंतर त्या वर्षासाठी देय शिष्यवृत्तीची रक्कम प्रणालीमार्फत निश्चित केली जाते.

मंजूर होणाऱ्या एकूण शिष्यवृत्तीमध्ये महाविद्यालयास देय असलेले शुल्क (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर न परताव्याचे शुल्क) आणि विद्यार्थ्यांना मिळणारा निर्वाह भत्ता या दोन्हींचा समावेश असतो. या एकत्रित रकमेपैकी ६० टक्के हिस्सा केंद्र शासनाच्या प्रणालीद्वारे निश्चित केला जातो.

या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारा निर्वाह भत्ता वगळता उर्वरित ६० टक्के रक्कम सात दिवसांच्या आत संबंधित महाविद्यालयात जमा करावी. यासाठी विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून अर्जामध्ये नमूद असलेल्या एकूण शुल्काची माहिती तपासावी, असे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी स्पष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->