नागभीड :- शिवटेकडी मार्गावर सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास भीषण अपघात घडला. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट वीज खांबावर आदळले. या अपघातात अमोल हरिदास जीवतोडे (वय 38) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या आई हिरकन्या जीवतोडे (वय 54) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमींना त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.