ब्रम्हपुरीमध्ये १० वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; शाळेत जाण्याआधीच दुर्दैवी घटना | Batmi Express

Be
0

Bramhapuri,Bramhapuri News,Bramhapuri Today,Bramhapuri Live,Chandrapur,Chandrapur News,

ब्रम्हपुरी
: शाळेत जाण्याची तयारी करत असताना एका १० वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील देलनवाडी येथे घडली. ईशान सत्यपाल आत्राम ( Ishan Satyapal Atram) असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो ब्रम्हपुरी येथील लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालयात इयत्ता चौथीत शिक्षण घेत होता.

माहितीनुसार, ईशान नेहमीप्रमाणे सकाळी उठून शाळेसाठी तयारी करत होता. आंघोळ करून गणवेश परिधान करत असतानाच सकाळी सुमारे ७ वाजता त्याला अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली कोसळला. ही घटना पाहून कुटुंबीय घाबरले आणि त्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी मृत घोषित करताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. एवढ्या लहान वयात हृदयविकाराचा झटका आल्याने परिसरातही आश्चर्य आणि हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->