इंस्टाग्राम ओळखीमधून प्रेमाचे आमिष आणि अत्याचार | Batmi Express

Be
0

Mul,Mul Crime,Mul News,Mul Today,Chandrapur Crime,

मुल : मुल तालुक्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींना फसवण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. इंस्टाग्रामवरील एका घटनेची चर्चा थंडावण्याआधीच, त्याच माध्यमातून ओळख वाढवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी घोसरी येथील २० वर्षीय तरुणाला अटक केली असून, अभिजित रवींद्र निकुरे (वय २०, रा. घोसरी, ता. पोंभुर्णा) असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीशी इंस्टाग्रामवर संपर्क साधत हळूहळू जवळीक निर्माण केली. संवादाच्या माध्यमातून तिचा विश्वास जिंकून प्रेमाचे आमिष दाखवले. त्यानंतर १६ एप्रिल रोजी त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही बाब समोर आल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांत तक्रार नोंदवली. तक्रारीनंतर मुल पोलिसांनी वेगाने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, मूल तालुक्यात आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी संवाद साधणे अल्पवयीन मुला-मुलींच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांच्या मोबाईल वापराकडे आणि सोशल मीडिया हालचालींकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->