चंद्रपूर हादरलं! किरकोळ वादातून तरुणाची हत्या; दुर्गापूरात खळबळ | Batmi Express

Be
0

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur News Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Crime,Chandrapur Crime News,

चंद्रपूर
:- दुर्गापूर परिसरात किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात यश फाले (वय २५) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोयना गेट परिसरातील एका नाश्ता व लस्सी सेंटरच्या मालक प्रफुल महाराणे याच्याशी यश याचा काही दिवसांपासून वाद सुरू होता. गुरुवारी दुपारी सुमारे अडीच वाजताच्या सुमारास हा वाद पुन्हा चिघळला. संतापाच्या भरात प्रफुलने बर्फ फोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘नोकुली’सारख्या धारदार वस्तूने यशवर हल्ला केला.

या हल्ल्यात यश गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, झटापटीत आरोपी प्रफुल महाराणे हाही जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. प्रभारी अधिकारी गौरव कायदेपंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई वेगाने सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->