चंद्रपूरमध्ये लिव्ह-इन पार्टनरची हत्या; प्रियकर अटकेत | Batmi Express

Be
0

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur News Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Crime,Chandrapur Crime News,

चंद्रपूर
: शहरातील दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुकुम परिसरात १४ मार्च २०२६ च्या रात्री एका महिलेचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला होता. सुरुवातीला हा प्रकार आत्महत्येचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, तपासानंतर हा खून असल्याचे उघड झाले आहे. आपल्या प्रेयसीचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी प्रियकराला दुर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे.


मृत प्रियंका वांढरे ही पतीपासून वेगळी राहत होती आणि ती २२ वर्षीय अंकेश बहीरवार याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. अंकेश हा प्रियंकापेक्षा सुमारे सात वर्षांनी लहान होता. दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. अशाच एका वादातून १४ मार्चच्या रात्री अंकेशने प्रियंकाचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.


घटनेनंतर अंकेशने हे प्रकरण आत्महत्येसारखे भासावे यासाठी बनाव करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी प्रियंकाला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सुरुवातीला सर्वांनी याकडे आत्महत्या म्हणून पाहिले. मात्र, शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याने श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.


त्यानंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवली. आयपीएस अधिकारी गौरव कायंदेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सखोल चौकशी केली. संशयित अंकेशला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.


पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल चार्जर व एक्स्टेंशन बोर्ड जप्त केला आहे. आरोपी अंकेश बहीरवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०३(१) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->