भरधाव रेती टिप्परची स्कूटीला जोरदार धडक; आईचा मृत्यू, मुलगी गंभीर | Batmi Express

Be
0

Gondia,Gondia Accident,gondia news,Gondia Today,Gondia Live,

गोंदिया
:- अंत्यसंस्कारासाठी स्कूटीने निघालेल्या आईचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला, तर तिची मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार (३ एप्रिल) रोजी दुपारी गोंदिया तालुक्यातील दासगाव परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रेतीने भरलेल्या भरधाव टिप्परने स्कूटीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या घटनेत रामेश्वरी धनलाल नागपुरे (वय ४५, रा. कटंगी कला) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेली मुलगी वैष्णवी ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रामेश्वरी नागपुरे या त्यांच्या सासूच्या निधनामुळे मुलीसह मध्य प्रदेशातील आरंभा येथे अंत्यसंस्कारासाठी निघाल्या होत्या. दरम्यान, दासगावजवळ येताच एमएच ४० बीएच ८०८० क्रमांकाच्या टिप्परने त्यांच्या स्कूटीला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की रामेश्वरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मुलगी काही अंतरावर फेकली जाऊन गंभीर जखमी झाली.

घटना समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. संतप्त नागरिकांनी टिप्पर चालकाला मारहाण करत रस्ता रोको आंदोलन केले. तसेच टायर जाळून निषेध नोंदवला. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

माहिती मिळताच रावणवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेतले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->