Gas Black Marketing Action: गडचिरोलीत एलपीजी गॅस काळाबाजार रोखण्यासाठी १२ विशेष पथके नियुक्त | Batmi Express

Be
0

Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli News,Gadchiroli Today,Gadchiroli News IN Marathi,

गडचिरोली :
जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा आणि गॅसची अवैध साठवणूक, गैरवापर तसेच काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांसाठी एकूण १२ विशेष दक्षता व फिरती पथके स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये आणि ग्राहकांना योग्य दरात सिलेंडर उपलब्ध व्हावेत, यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले असून त्यात निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक आणि कनिष्ठ लिपिकांचा समावेश करण्यात आला आहे. ही पथके जिल्ह्यातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांच्या वितरकांसह इंडेन गॅससह सर्व एलपीजी एजन्सींची तपासणी करणार आहेत.

तपासणीदरम्यान घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध साठा, व्यावसायिक वापरासाठी त्याचा गैरवापर किंवा ग्राहकांकडून ठरलेल्या दरापेक्षा जास्त पैसे आकारले जात असल्याचे आढळल्यास संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ तसेच इतर लागू कायद्यांनुसार कठोर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

तसेच या पथकांना केवळ तपासणीपुरते मर्यादित न ठेवता केलेल्या तपासणी व कारवाईचा दररोजचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. संपूर्ण मोहिमेवर संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांचे नियंत्रण राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Gooo it!
To Top
-->