चंद्रपूर: जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 16 मार्च रोजी; पीडित महिलांना तक्रारी मांडण्याचे व्यासपीठ | Batmi Express

Be
0

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,

चंद्रपूर, दि. 12 :
समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच महिलांच्या तक्रारी व समस्या शासकीय यंत्रणेमार्फत सोडविण्यासाठी आणि समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. त्या अनुषंगाने 16 मार्च रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्या महिलांच्या तक्रारी, निवेदने, अडचणी किंवा समस्या वैयक्तिक स्वरूपाच्या असतील, अशा महिलांनी आपली तक्रार महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवसांपूर्वी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर यांच्या कार्यालयात दोन प्रतींमध्ये सादर करावी.

16 मार्च रोजी दुपारी 1 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी, चंद्रपूर यांच्या दालनात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी आपल्या प्रश्नांच्या निराकरणासाठी या महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Gooo it!
To Top
-->