चंद्रपूर: आनंदवनात शासकीय योजनांचे तीन दिवसीय छायाचित्र प्रदर्शन सुरू | Batmi Express

Be
0

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,

चंद्रपूर :
राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी तसेच या योजनांचा लाभ त्यांना मिळावा, या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने वरोरा येथील आनंदवनातील मुख्यमंत्री सभागृहात तीन दिवसीय शासकीय योजनांचे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन वरोरा येथील उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 12) करण्यात आले.

यावेळी वरोरा येथील तहसीलदार योगेश कौटकर, आनंदवनच्या अंतर्गत व्यवस्थापन विश्वस्त पल्लवी आमटे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, आनंदवनचे जनसंपर्क अधिकारी राजेश ताजणे, वाचा उपचार तज्ज्ञ रविकांत घोलप तसेच विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप भस्के म्हणाले की, राज्य शासनाच्या सूचनेनुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’अंतर्गत नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून 12 ते 14 मार्च या कालावधीत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शासकीय योजनांचे छायाचित्र प्रदर्शन येथे आयोजित करण्यात आले आहे. तसेच याच ठिकाणी 14 मार्च रोजी महसूल समाधान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. नागरिक व विद्यार्थ्यांनी विविध योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

आनंदवनच्या विश्वस्त पल्लवी आमटे म्हणाल्या की, नागरिकांसाठी शासनाच्या अनेक चांगल्या योजना उपलब्ध आहेत. यात रोजगार व उद्योगासंबंधी महत्त्वाची माहितीही देण्यात आली आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून सरकार मदत देण्यास तयार आहे, त्यामुळे नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. योजनांचा योग्य फायदा झाला तर नागरिकांचे आयुष्य उभे राहू शकते. आनंदवन नेहमीच अशा उपक्रमांमध्ये सहभागी राहिले आहे, असेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते फित कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रविकांत घोलप यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी मानले.

सदर छायाचित्र प्रदर्शन मुख्यमंत्री सभागृह, आनंदवन, वरोरा येथे 12, 13 आणि 14 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. परिसरातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन शासकीय योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Gooo it!
To Top
-->