चंद्रपूर :- इरई धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला.
धरणाचे एकूण सात दरवाजे उघडण्यात आले असून, त्यापैकी तीन दरवाजे १ मीटर आणि उर्वरित चार दरवाजे ०.७५ मीटरने उघडले आहेत. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा ओघ सुरू झाला आहे.
या विसर्गामुळे इरई नदी तसेच तिच्या उपनद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात अथवा किनाऱ्यालगतच्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रशासनाशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.