![]() |
गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले |
भंडारा/गडचिरोली: गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणातून वैनगंगा नदीपात्रात सुरू असलेल्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. सध्या 3605 क्युमेक्स विसर्ग सुरू असून तो वाढवून 4,000 क्युमेक्सपर्यंत नेण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, गडचिरोली यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, पुढील काळात विसर्गामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, पाण्याच्या येवामध्ये अनपेक्षित वाढ झाल्यास आणि धरण तसेच भंडारा शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो.
पाण्याच्या विसर्ग सुरूच आहे याची माहिती सध्या आम्हाला मिळाली आहे. तरी नदीपात्रात आवागमन करू नये व नदीकाठावरील गावकऱ्यांनी विशेष खबरदारी बाळगावी व सतर्क राहावे. संबंधित प्रशासन यंत्रणेने दक्ष राहावे व आपल्या स्तरावरून संबंधितास तसे अवगत करावे, ही विनंती.
वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याने नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी व सतर्क राहावे. नदीपात्रात अवागमण करु नये ही विनंती. - जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.