गडचिरोली :-गडचिरोली :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी ४ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत संपूर्ण गडचिरोली जिल्हा “उड्डाणबंदी क्षेत्र” म्हणून जाहीर केला आहे.
या आदेशानुसार ड्रोन, पॅराग्लायडर, हॉट एअर बलून, रिमोट कंट्रोल उड्डाण साधने यांचा वापर संपूर्णपणे बंदीस्त राहणार आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा आदेश ड्रोन नियम २०२१ मधील तरतुदींनुसार काढण्यात आला आहे.
सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.