![]() |
वर्धा नदीला पूर |
अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वर्धा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. या अचानक वाढलेल्या पाण्याच्या लाटेमुळे घुग्गूस-गडचंदूर मार्गावरील महत्त्वाचा भोयगाव पूल पाण्याखाली गेला आहे. (Wardha River Overflows)
सुरक्षिततेच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत गडचांदूर-घुग्गूस मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश वाहनधारकांना देण्यात आले आहेत. पूरस्थितीमुळे अनेक गावांतील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी न जाण्याचे तसेच पुढील आदेश मिळेपर्यंत अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतत पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, नदीकाठच्या खेड्यांमध्ये पाण्याचा विसर्ग वाढल्याने शेतकऱ्यांच्या पिकांनाही धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.