![]() |
जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे आज हे मार्ग बंद |
Gadchiroli Flood Updates: मागील दोन दिवसापासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. आज सकाली सुमारे 11.00 वा. वाजताच्या सुमारास 11 प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. काही भागांत रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने वाहनचालक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. Gadchiroli Flood Updates:
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, विशेषतः पूल आणि नाल्यांवरून पाणी वाहत असताना त्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुराच्या पाण्याचा वेग अनपेक्षितरीत्या वाढू शकतो, त्यामुळे सुरक्षितता राखणे अत्यावश्यक आहे.
नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आपले व कुटुंबाचे संरक्षण करावे, तसेच अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुरामुळे बंद असलेले मार्ग दि. 19.08.2025
वेळ सकाळी 11.00 वा.
- चांदाळा ते रानमुल, माडेमुल मार्ग बंद आहे
- चांदाळा ते कुंभी मार्ग बंद आहे
- वाकडी ते कृपाळा मार्ग बंद आहे
- चांभार्डा ते अमीर्झा मार्ग बंद आहे
- गडचिरोली ते गुरवडा मार्ग बंद आहे
- विहिरगाव ते गुरवडा मार्ग बंद आहे
- मुडझा ते पुलखल मार्ग बंद आहे
- तळोधी ते मुरमुरी मार्ग बंद आहे
- बोरी गणपूर हळदी मार्ग बंद आहे
- पेंढरी ते ढोरगट्टा बांडे मार्ग बंद आहे
- जांभळी ते साखेरा मार्ग बंद आहे
- कटेझरी ते चातगाव मार्ग बंद आहे
- निमगाव ते रांगी मार्ग बंद आहे
- चामोर्शी माल ते वैरागड मार्ग बंद आहे
- किन्हाळा ते फरी मार्ग बंद आहे
- डोंगरगाव (ह) ते पळसगाव मार्ग बंद
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.