दोन दहावीच्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यात आज, शनिवार १६ ऑगस्ट रोजी दुपारी दुर्दैवी घटना घडली. महालक्ष्मी नगर, सिंदेवाही येथील दोन १६ वर्षीय विद्यार्थी नदीत पोहायला गेले असता बुडून मृत्यूमुखी पडले. मृतांमध्ये आयुष दीपक गोपाले व जीत टीकाराम वाकडे (दोघेही वय १६) यांचा समावेश आहे.
दोघेही दहावीत शिक्षण घेत होते. कृष्ण जन्माष्टमीच्या सुट्टीमुळे दुपारी टेकरी गावाजवळील नदीकाठी ते फिरायला गेले होते. त्यानंतर आंघोळीसाठी नदीत उतरले असता खोल पाण्यात गेले आणि बाहेर येऊ शकले नाहीत.
स्थानिकांनी तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पुढील तपास सिंदेवाही पोलिस करीत आहेत.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.