![]() |
जारगावमध्ये पतीकडून पत्नीचा खून |
पाचोरा (प्रतिनिधी): पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर चाकूने वार करत तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव प्रियंका भदाणे (वय २५) असे आहे.
प्राथमिक माहितीनुसार, खुशाल भदाणे असे आरोपी पतीचे नाव असून, तो गेली चार ते पाच वर्षे जारगाव येथे भाडेकरू म्हणून राहत होता. त्याला पत्नीच्या वागणुकीबाबत शंका होती. शनिवारी, २० जुलै २०२५ रोजी पहाटे त्यांच्यात जोरदार वाद झाला. रागाच्या भरात खुशालने घरात असलेल्या चाकूने प्रियंकाच्या गळा, मान आणि पोटावर वार केले. त्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनानंतर खुशालने स्वतःला फास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा मुलगा जागा झाला आणि आरडाओरड केल्याने गावकऱ्यांनी वेळीच धाव घेतली. पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर पाचोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार, सहायक निरीक्षक संजय निकुंभ, उपनिरीक्षक योगेश गणगे आदींनी घटनास्थळी येत आरोपीला ताब्यात घेतले.
मयत प्रियंकाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. तिच्या पश्चात दोन लहान मुले असून, कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे.
या प्रकरणी प्रियंकाच्या मावशीने दिलेल्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात खुशाल भदाणे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय निकुंभ यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
डीवायएसपी गणेश आव्हाड यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, मोबाईल फोरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची तपासणी करण्यात आली आहे.
Man Kills Wife in Jargav Over Suspected Infidelity; Arrested by Police
Pachora (Correspondent): A shocking incident has come to light in Jargav village of Pachora taluka, where a man allegedly murdered his wife due to suspicions about her character. The deceased has been identified as Priyanka Bhadane, 25. The brutal killing has sent shockwaves through the local community.
According to initial information, the accused husband has been identified as Khushal Bhadane, who had been living in Jargav as a tenant for the past four to five years. He reportedly doubted his wife’s fidelity. On the morning of July 20, 2025, a heated argument broke out between the couple. In a fit of rage, Khushal allegedly attacked Priyanka with a kitchen knife, stabbing her multiple times in the throat, neck, and abdomen. She died on the spot due to severe injuries.
After the incident, Khushal reportedly attempted to hang himself, but their child witnessed it and raised an alarm. Locals rushed to the scene and informed the police. Officers from Pachora Police Station, including Inspector Rahulkumar Pawar, Assistant Inspector Sanjay Nikumbh, and Sub-Inspector Yogesh Gange, reached the location and took Khushal into custody.
Priyanka’s body was sent to the Pachora Rural Hospital for postmortem, after which it was handed over to her family. She is survived by two young children, adding to the tragedy.
Based on a complaint filed by Priyanka’s maternal aunt, a murder case has been registered against Khushal Bhadane at the Pachora Police Station. Further investigation is being conducted under the guidance of Inspector Pawar and Assistant Sub-Inspector Sanjay Nikumbh.
Deputy SP Ganesh Awhad also visited the crime scene and issued directions to the investigating team. A mobile forensic van was deployed for detailed site inspection and evidence collection.