ब्रम्हपुरी: गोसीखुर्द धरणातून मोठा विसर्ग; लाडज गांव महापुराच्या विळख्यात | Batmi Express

Chandraapur,Ladaj,Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur Live,Chandrapur Flood,Goshikhurd,Gosikhurd,Chandrapur Flood 2025,Gosikhurd Flood Live,Gosikhur

Chandraapur,Ladaj,Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur Live,Chandrapur Flood,Goshikhurd,Gosikhurd,Chandrapur Flood 2025,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2025,Bramhapuri News,
लाडज गांव महापुराच्या विळख्यात

ब्रम्हपुरी 
: सतत धार पडत असलेल्या पावसामुळे गोसीखुर्द धरणातून मोठा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात सुरू आहे. तालुक्यातील लाडज गांव महापुराच्या विळख्यात. लाडज हे गाव चारही बाजूने वैनगंगा नदीने वेढलेले आहे. मागील 2-3 दिवसांपासून गोसीखुर्द क्षेत्रात सतत रिमजीम आणि कुठं कुठं मुसळधार पाऊस पडत आहे. पहिल्यांदा वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरवर्षी लाडज गावाला नेहमी बेटाचे स्वरूप प्राप्त होते. गावात आरोग्य सूविधा नाही. त्यामुळे येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. 

त्यामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसत आहे. ब्रम्हपूरी तालुक्यात वडसा-ब्रम्हपूरी मार्गावरील वैंनगंगा नदीकाठावर लाडज हे गाव आहे. याठिकाणी मागील एक दिवसापासून पुरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या लाडज गावच तालुका संपर्क तुटलेला आहे. 

सन 2004-05 आणि 2015-2016 मध्ये पाण्यात बुडून अनेकांना आपलं जीव गमवावा लागला. सन 2020 मध्ये 1994 पेक्षाही मोठं महापूर आलं होत. संपूर्ण गावात पुराचे पाणी साचलेले होते. हेलीकॉप्टर च्या आणि बोट च्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे लागले होते. 

त्यामुळे स्थानिक प्रशासन जास्त रिक्स घ्यायला तयार नाही शिवाय ज्यांच्याकडे डोंगे आहेत अशा व्यक्तींना जास्त प्रवाहात डोंगे टाकण्यास स्थानिक प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे. गावात आरोग्य सुविधेचा अभाव असून लहान मुले, गरोदर स्त्रिया, वृध्द नागरिक व इतर साठी एक आपतकालीन बोट उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे. 

सन 2020 सालच्या महापुराची पुरावृत्ती होण्याचीही मोठी शक्यता यावर्षी सुद्धा  करण्यात येत आहे. त्यामुळे तात्काळ प्रशासनाने याची दखल घेवून आवश्यक ती मदत करावी अशी मागणी अ गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.