भंडारा: गोसीखुर्द धरणाच्या (Bhandara Gosikhurd Dam) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणाचे 33 पैकी 33 उघडण्यात आले असून धरणातून आवश्यकते नुसार टप्प्याटप्प्याने विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येईल. विसर्ग किती सोडण्यात येणार आहे याची माहिती सध्या आम्हाला मिळाली नाही आहे. तरी नदीपात्रात आवागमन करू नये व नदीकाठावरील गावकऱ्यांनी विशेष खबरदारी बाळगावी व सतर्क राहावे. संबंधित प्रशासन यंत्रणेने दक्ष राहावे व आपल्या स्तरावरून संबंधितास तसे अवगत करावे, ही विनंती.
नोट : विसर्ग विषयी माहिती काही वेळातच अपडेट केली जाईल.
नोट : बातमी लेखनात बदल चालूच राहणार - वाचकांनी AI चा वापर सुद्धा करांव. : क्लिक मी
सूचना : सध्या गोसीखुर्द चे 33 दरवाजे उघडले असल्याची माहिती आली. आवशक्यता पडल्यास विसर्गात पुन्हा वाढ होईल - अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे. असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
प्रशासनाचे अलर्ट: आपल्या जिल्ह्यातील वैनगंगा नदी पात्रात गोसीखुर्द धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क आणि सुरक्षित राहावे. संपर्क १०७७
गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये- जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन बातमी एक्सप्रेस टीम सर्व जिल्ह्यातील वाचकान करीत आहे.