Gosikhurd Flood | गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले; पाण्याचा विसर्ग सुरू; नागरिकांना सतर्कतेचा इशारा | Batmi Express

Gosikhurd Flood Live Updates,Gadchiroli,Bramhapuri,Goshikhurd,Gosikhurd,Bhandara,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2023,Bhandara Gosikhurd Dam,Gosikhurd News,Bhandara News,

भंडारा: गोसीखुर्द धरणाच्या  (Bhandara Gosikhurd Dam पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणाचे 33 पैकी 33 उघडण्यात आले असून धरणातून आवश्यकते नुसार टप्प्याटप्प्याने 2 लाख 50 हजार क्युसेक पर्यंत विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येईल.

भंडारा जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस झाल्यामुळे जिल्ह्याला धोका निर्माण होऊ नये गोसीखुर्द धरणातून आवश्यकते नुसार टप्प्याटप्प्याने 2 लाख 50 हजार क्युसेक पर्यंत विसर्ग सोडण्यात येईल. तरी नदीपात्रात आवागमन करू नये व नदीकाठावरील गावकऱ्यांनी विशेष खबरदारी बाळगावी व सतर्क राहावे. संबंधित प्रशासन यंत्रणेने दक्ष राहावे व आपल्या स्तरावरून संबंधितास तसे अवगत करावे, ही विनंती.


नोट : बातमी लेखनात बदल चालूच राहणार - वाचकांनी AI चा वापर सुद्धा करांव. : क्लिक मी

सूचना : सध्या गोसीखुर्द चे 33 दरवाजे उघडले असल्याची माहिती आली.  आवशक्यता पडल्यास विसर्गात पुन्हा वाढ होईल - अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे. असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

प्रशासनाचे अलर्ट: आपल्या जिल्ह्यातील वैनगंगा नदी पात्रात गोसीखुर्द धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क आणि सुरक्षित राहावे. संपर्क १०७७


बातमी एक्सप्रेस अलर्ट : नदी काठच्या गावांना इशारा - चंद्रपुर , गडचिरोली:

गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये- जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन बातमी एक्सप्रेस टीम सर्व जिल्ह्यातील वाचकान करीत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.